घोणदांड-खडसांबळे लेणी-सुधागड-नाणंदांड
जय श्रीराम डोंगरांच्यात हरवलो मी.. कधी काळ चे महापुरुष हे.. आजानू बाहूच जणू.. केवढा तो पसारा केवढी ती उंची.. केवढा तो आधार.. केवढे ते कर्तृत्व.. केवढे ते रंग.. त्या रंगात रमलो मी.. डोंगरांच्यात हरवलो मी.. सह्याद्रीच्या पहाडां मध्ये दोन दिवस हरवायलाच जणू आमचा चमू बाहेर पडला होता! नेहमी प्रमाणे तुषार ने दमदार प्लॅन केला होता. घनगड किल्ल्याच्या इथल्या दोन घाटवाटा, सुधागड सारखा महत्वाचा किल्ला आणि खडसांबळे लेणी असा ट्रेक प्लॅन होता . घनगड हा किल्ला लोणावळ्याच्या दक्षिणेला साधारण ४० कमी अंतरावर आहे.एकोले हे पायथ्याचे गाव. आम्ही मागच्या वर्षी २०१७ मध्ये घनगड शेजारच्या केवणी पठाराच्या इथला नळीची वाट आणि डेऱ्या घाट हा ट्रेक केला होताच, तेव्हाच केवणीच्या बाकीच्या दोन घाट वाटा पण करूयात अस ठरल होत. तुषार नि त्याला सुधागड ची पण जोड दिल्या मुले प्रकरण जरा जास्त भारदस्त झाल होत हे मात्र नक्की. या ट्रेक ची सगळ्यात मोठी खास बात म्हणजे आमच्या पुणे ट्रेक ग्रुप चे ३ musketeers डॉक्टर श्रीकांत ओक उर्फ श्रीकांत दादा, हर्डीकर काका आणि आठवले काका असे तिघे वय...